HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत चर्चा; ‘या’ मुद्द्यांवर झाली बैठक

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची काल रात्री बैठक पार पडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काल (11 सप्टेंबर) रात्री पावणे दोन तास बैठक झाली. या बैठकीदरम्यान गणेश विसर्जनाच्या दिवशी दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसेनामध्ये राडा आणि राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे.

दरम्यान, गणेशोत्सवानंतर राज्यात आज (12 सप्टेंबर) मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गट-शिवसेनामधील राडा हा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. याव्यतिरिक्त राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुनही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तसेच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म अॅक्ट गुन्हा दाखल झाला असून यानुसार सरवणकर यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती मिळाली आहे. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमके काय झाले

शिवसेनेकडून गणपती विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांचे स्वागतासाठी मंच उभारण्यात आला होता. पण, शिवसेनेच्या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील मंच उभार केला होता. या मंचावरून सरवणकरांचे चिरंजीव समाधान सरवणकरांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेचे नेत्यांना चिडविले होते. यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. या शाब्दिक चकमकीचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणामुळे दादर परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. या प्रकरणावर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर काहीसा कमी झाला होता. शिंदे गटाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे. शिवसैनिक सगळे हे सहन करायचे का?, आमच्या विभाग प्रमुखांना गोळीबारातून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला. परंतु, सरवणकरांनी हा आरोप फेटाळून लावला.

संबंधित बातम्या

शिवसेना-शिंदे वादविवाद प्रकरणी 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल तर 5 जणांना अटक

“शिवसेना रस्त्यावर उतरेल, मग खरी शिवसेना काय…”, अरविंद सावंतांचा शिंदे गटाला इशारा

“एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून…”, सदा सरवणकरांचा शिवसेनेवर आरोप

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

कर्नाटक निवडणुक, दुपारपर्यंत ५६ टक्के मतदान

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

News Desk