HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार

मुंबई | मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह प्रधानमंत्र्यांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले, “आज मराठी भाषा गौरव दिना निमित्ताने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. यासाठी लवकरच तातडीने मी, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे शिष्ठमंडळ यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू आणि त्यांना विनंती करू. आणि आपली विनंती ते मान्य करतील. यासाठी आपण पंतप्रधानांची तातडीने भेट घेऊ. ”

 

 

Related posts

रेल्वे अपघात रोखण्यासाठी घेणार जपानची मदत

News Desk

महाविकासआघाडी सरकारकडून OBC समाजाची कोंडीच, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Aprna

कंटेंन्टमेंन्ट झोन मध्ये प्रवेश केल्याप्रकरणी धस यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk