HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

कसब्यातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई | कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत रासने यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.  पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले आहे.

हेमंत रासने यांनी पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करून रविवारी मतदान केल्याने त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणुकीचा प्रसार संपल्यानंतर हेमंत रासनेंनी कमळाची पट्टी घालून प्रचार केल्याचे दिसून आले. यामुळे हेमंत रासनेंवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुन्हा दखल करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी करण्यात आली होती. आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.  तसेच शिवसेना पुणे शहर ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांना लेखई निवेदन देऊन तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करतानाच फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या प्रकरणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केल्याने त्याबाबत तक्रार करण्यात आली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा विसवे यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

Related posts

राज्यात सरकार कधी स्थापन होणार !

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी केले ध्वजारोहण 

News Desk

‘ईडी’चा यू टर्न, शरद पवारांनी तूर्तास चौकशीला येण्याची गरज नाही

News Desk