HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंची घेतलेली भेट ही सदिच्छा भेट होती! – मुख्यमंत्री

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. मुख्यमंत्री पहिल्यांदा राज ठाकरेंच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले आहेत. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. मुख्यमंत्री आज (1 सप्टेंबर) सायंकाळी 4. 30 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले. ही सदिच्छा भेट असून भेटीदरम्यान कोणती राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “आनंदाचे वातावरण सगळीकडे आपण पाहतोय आणि त्यामुळे गणेश उत्सवानिमित्त त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंच्या घरी आलेले दर्शन घेतलेला आहे. बाकी काहीच नाही सदिच्छा भेट घेतली राज ठाकरेंचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. यामुळे राज ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन खरे म्हणजे राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे नांदी कशी ठरेल आणि समीकरणे काय भेट होती. मी त्यांचा ऑपरेशन जेवण झाले त्याच वेळेस येणार होतो. पण आज गणपतीचा योगायोग देखील आहे. आणि त्यांचा देखील .”

मुख्यमंत्री म्हणाले,”मला वाटत विसर्जन निघाल्या आणि जुन्या आठवणींना देखील उजाळा मिळालेला आहे. सगळेजण बाळासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सानिध्यामध्ये काम केलेले आहे त्यावेळेस देखील राज ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये काम केले. या जनता ठरवत असते आणि त्यामुळे जी संधी मिळालेली आहे. या संधीच सोनेजी आहे. जनतेच्या हिताकरिता आमचे शिवसेना भाजपा युतीचे सरकार देवेंद्र उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही दोघे आणि आमचे मंत्रिमंडळ सरकार सर्वसामान्यांच्या येतानाच प्राधान्य देणार आहे आणि त्याची प्रचिती महाराष्ट्र पाहतोय की अतिशय कमी वेळात देखील अतिशय मोठे निर्णय घेण्याचे धाडस केलेलं आहे चर्चा किंबहुना राजकारणावर चर्चा कुठली झाली नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो.”

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मिशन दापोली साई रिसॉर्ट!, अनिल परबांविरोधात सोमय्या हातोडा घेऊन सज्ज

Manasi Devkar

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंना धक्का बुकी

News Desk

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk