HW News Marathi
राजकारण

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठीक नसल्याने ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीविषयी शनिवारपासूनच (१६ मार्च) अनेक उलट-सुलट अफवा पसरविल्या जात होत्या. दरम्यान, आता मात्र मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती ट्विटच्या माध्यमातून देण्यात आली आहे. “गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टर्स सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत”, असे ट्विट गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.

मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त शनिवारपासूनच येत असताना भाजपच्या नेत्यांकडून मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आज (१७ मार्च) सकाळी मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगण्यात आले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस; विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Aprna

मराठा आरक्षणासाठी शहा आणि फडणवीस यांची दिल्लीत बैठक

News Desk

राम कदमांचे प्रवक्तेपद जाणार ?

News Desk
मनोरंजन

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

News Desk

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.

Related posts

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk