HW News Marathi
राजकारण

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली | तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बुधवारी (२६ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांची पंतप्रधान मोदींसह पहिली बैठक आहे. यावेळी चंद्रशेखर राव यांनी १० मागास जिल्ह्यांसाठी निधी, तेलंगणासाठी उच्च न्यायालयाची स्थापना, नवीन जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालय, तसेच करीमनगर जिल्ह्यातील आयआयआयटी यासह अन्य विविध विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा केली आहे.

चंद्रशेखर राव यांनी ओडिशाचे माजी मंत्री नवीन पटनायक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली आहे. ते आता बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ते सोमवारपासून (२४ डिसेंबर) दिल्लीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द

swarit

मी घड्याळाच्या चिन्हासमोरचे बटण दाबले अन् कमळाला मत गेले !

News Desk

नवमतदारांनो, आपले पहिले मत हे वीर जवानांना समर्पित करा !

News Desk