HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’ कृतीचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

मुंबई | “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक मोठा भाऊ या नात्याने पत्र लिहून परत येण्याची विनंती केली आहे,”  मुख्यमंत्र्याच्या भूमिकेचे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना कौतुक केले आहे. सुप्रिया सुळे यांनी आज (28 जून) राज्यातील राजकीय संघर्षसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब यांचे स्मरण केले. राजकारणात यश-अपयश, चढ-उतार येत असतात, सत्ता येते-जाते, मात्र माणसे आणि नातीच आयुष्यात टिकतात.”

सुप्रिया सुळे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व माँ साहेब यांचे स्मरण केले. राजकारणात यश-अपयश, चढ-उतार येत असतात, सत्ता येते-जाते, मात्र माणसे आणि नातीच आयुष्यात टिकतात,” असे मत सुप्रिया सुळेंनी मांडले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना एक मोठा भाऊ या नात्याने परत येण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची भूमिका  उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. चर्चेतूनच प्रश्न सोडविले जाऊ शकतात,” असे मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. जे लोक याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते आज ते शिवसेनेत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करतात अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यांनी जरी आरोप केले तरी आम्ही त्यांच्याविषयी सदैव प्रेमभावना बाळगू असे त्या म्हणाल्या.”

समोर बसून चर्चेतून सोडविण्यात यावे
“देशात असलेल्या संविधानाचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपण संविधानाच्या मार्गाने जायला हवे. जे मतभेद असतील ते समोर बसून चर्चेतून सोडविण्यात यावे,” असे सुप्रिया म्हणाल्या. पुढे त्या म्हटल्या, “संविधानाने चालणाऱ्या आपल्या देशात चर्चेचा अधिकार प्रत्येकाला आहे. लोकशाहीत चर्चा ही झालीच पाहीजे अन्यथा ती दडपशाही होते. त्यामुळे संविधानाचा सर्वांनी आदर ठेवला पाहिजे,” असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Aprna

राष्ट्रवादीला लोकसभेत दोन अंकी आकडा गाठणे शक्य नाही !

News Desk

अब्दुल सत्तारांचा पक्षातील काही लोकांवर गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna