HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

नवी दिल्ली । काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा निवडणूक विभागाने क्लीन चिट दिली आहे. सिद्धू यांचे वक्तव्य हे निवडणुकीसाठीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे म्हणत या संदर्भातील अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्याची माहिती एका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपकडून मात्र याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

“पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल असे वादग्रस्त विधान करणाऱ्याला क्लीन चिट देणे हा पक्षपात आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी अनेकदा आपल्या सभांमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन करणारी विधाने केली आहेत. त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली गेली पाहिजे”, या शब्दात मध्य प्रदेशमधील भाजप प्रवक्ते उमेश शर्मा यांनी सिद्धू यांना दिलेल्या क्लीन चिट प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.

या वक्तव्यामुळे सिद्धूविरुद्ध आचारसंहिता भंगची तक्रार दाखल केली गेली 

मध्य प्रदेशमधील इंदूर येथील प्रचारसभेत १० मे रोजी नवज्योत सिंग सिद्धू यांनी “मोदी हे नव्या नवरीसारखे आहेत. जी भाकऱ्या कमी भाजते, पण तिच्या बांगड्यांचा आवाजच जास्त असतो. मोदी सरकारची गत तशीच आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर भाजपकडून सिद्धू यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

Related posts

सवर्णांना मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणाच्या विधेयकावर सायंकाळी चर्चा

News Desk

माझ्या वाढदिवशी कसलीही शो-बाजी न करता गरजू विद्यार्थ्यांना मदत करा !

News Desk

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यास महापालिका खंबीर | पुणे महापौर

News Desk