HW News Marathi
राजकारण

“ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो”, मुख्यमंत्र्यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

मुंबई | “ताई मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो”, असे प्रत्युत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या टीकेला दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी  जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री हे आज (12 सप्टेंबर) औरंगबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात सभा घेतली.

मुख्यमंत्र्यांनी पैठणमधील भाषणातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणात म्हणाले, “अजित दादा टीका करत होते, आता सुप्रिया ताई सुद्धा टीका करत आहेत. मी त्यांना ऐवढेच सांगतो की, ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असे म्हणत सुप्रिया सुळेंच्या टीकेला त्यांनी पैठण सभेतून प्रत्युत्तर दिले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादा सकाळी सहा वाजल्यापासून काम सुरू करतात. पण, मी ताईना ऐवढेच सांगतो की, काम करतो. कोणी निंदा, कोणी वंदा टीका करणे हेच विरोधकांचा धंदा आहे. पण, मी त्यांना सांगतो की, आम्ही कामातून उत्तर देतो,” असे ते म्हणाले. विरोधकांच्या शब्दसंग्रहात दोनच शब्द आहेत. ‘गद्दार आणि खोके’, अशी टीका करत नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टीका केली.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

RamMandir : उद्धव ठाकरे ‘लक्ष्मण किला’ येथे पोहोचले

News Desk

केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार! – मुख्यमंत्री

Aprna

शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार

News Desk