HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

कमलनाथ यांच्या सचिवांच्या घरासह तब्बल ५० ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी

नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना आयकर विभागाकडून देशातील ३ राज्यांत तब्बल ५० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या जयनगरमधील घरावर रात्री तीन वाजताच्या सुमारास आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाने मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ त्याचप्रमाणे गोवा आणि दिल्लीतील ३५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास १५ अधिकारी अद्याप प्रवीण कक्कड यांच्या घराची झडती घेत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांच्यासह कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर देखील छापेमारी करण्यात आली आहे. दिल्लीच्या आयकर विभागाने रात्री उशिरा तब्बल ५० ठिकाणी छापे टाकले आहेत.

Related posts

अन् संजय राऊत यांनी ‘ते’ ट्विटच डिलीट केले

News Desk

#LokSabhaElections2019 : आमच्या लोकशाहीची तीच खासीयत आहे!

News Desk

काय होतास तू काय झालास तू !, भाजपची बोचरी टीका

News Desk