HW News Marathi
राजकारण

प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार दाखल

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (२१ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये २१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. त्याचप्रमाणे २१ सप्टेंबरपासून (शनिवारी) महाराष्ट्रासह हरियाणामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी मतदारांमध्ये मेकअप बॉक्सचे वाटप केल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे. नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे प्रणिती शिंदेयांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावर प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मेकअप बॉक्सचे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार नरसय्या आडम यांनी केली आहे.

केवळ स्टंटबाजी म्हणून कॅमेऱ्यासमोर आरोप !

“नरसय्या आडम यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मी दरवर्षी लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असते. मी नेहमीच महिलांना काही ना काही गोष्टी देत असते. मात्र, नरसय्या आडम यांनी केवळ स्टंटबाजी म्हणून कॅमेऱ्यासमोर माझ्यावर हे आरोप केले आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही”, असे स्पष्टीकरण प्रणिती शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी त्यांच्यावरील हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का; मलिक-देशमुखांचा मतदानाचा अर्ज फेटाळला

Aprna

दिल्लीचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

News Desk

कॉंग्रेसकडून भारत बंदचे आवाहन, मुंबईत ठिकठिकाणी होणार निदर्शने

News Desk