HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या नगरसेविका के. पी. केणी यांचे पद रद्द

मुंबई | मालाड येथील मालवणी व्हिलेजच्या प्रभाग क्र. ३२च्या काँग्रेस नगरसेविका के. पी. केणी यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवले आहे. काँग्रेस नगरसेविकेचे पद रद्द झाल्यामुळे याच वॉर्ड मधील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार गीता भंडारी यांना नगरसेवक म्हणून आता महापालिका सभागृहात जाता येणार आहे.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला आहे. पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ एकने वाढून ९५ वर पोहचले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्यणाची प्रत महापालिका आयुक्त आणि कोकण विभागीय आयुक्तांना देण्यात आली आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला चार अपक्षांचा पाठिंबा आहे. तर भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. पुढे भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचे संख्याबळ एकने वाढले, भाजप डोईजड होण्याच्या शक्यतेने शिवसेनेने शेवटी मनसेचे सहा नगरसेवक आपल्या बाजूला वळवले. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ९४ वर पोहोचले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

क्षयमुक्त भारताचे उद्दिष्ट यशस्वी करावे; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

Manasi Devkar

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आपच्या महाराष्ट्राच्या संयोजक पदी निवड

swarit

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar
राजकारण

निसर्गावर बोलू काही…

News Desk

मुंबई | रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर कधीतरी स्वतः साठी थोडा वेळ काढून जीवनाचा आनंद घेता यावा यासाठी ट्रेकिंग हा the best’ उपाय मानला जातो. ट्रेकिंगमुळे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहता येते ज्याचा फायदा आपल्या आरोग्यावर होतो. यासाठीच BWNA ही संस्था महिन्यातून कमीत कमी एकदा तरी शहराच्या प्रदूषण युक्त वातावरणापासून दूर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी ट्रेक ठेवते. जन सामान्यांमध्ये निसर्ग, पर्यावरण आणि भटकंती याविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये करण्यात आली आहे. याचे रूपांतर नंतर विद्यार्थ्यांसाठी खास निसर्ग साहस शिबीर आयोजित करण्यामध्ये झाले. शिबिराच्या माध्यमातून BWNA ट्रेकिंग, climbing, rappeling, valley crossing, jumaring इत्यादी असे अनेक साहसी उपक्रम विद्यार्थ्यांना शिकवतात. गेली १५ वर्षे अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची गोडी निमार्ण व्हावी आणि त्याच बरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत व्हावी म्हणून निरनिराळ्या उपक्रमांची जोड देत आहेत.

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना अशा शिबिरांमार्फत विद्यार्थ्यांना एक आदर्श नागरिक म्हणून समाजात वावरता यावे हेच या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट असते. गेल्या १६ वर्षांपासून संस्थेच्या माध्यमातून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे आपले राष्ट्रीय सण वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आणि लेण्यांमध्ये साजरे केले जातात. सामाजिक बांधिलकी म्हणून या दिवशी किल्ले, लेणी परिसर स्वच्छता, झेंडावंदन, आदिवासी पाड्यांमध्ये कपडे व उपयोगी वस्तू वाटून असे अनेक उपक्रम आयोजित केले जातात. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या पनवेल शाखेसोबत BWNA प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांसाठी साहसी उपक्रम आयोजित केले जातात. लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा मधील शाळेतील मुला-मुलींसाठी देखील आकाश दर्शन व साहसी उपक्रम दरवर्षी घेतले जातात. प्रकाश आमटे व इतर आमटे कुटुंबीय यांच्यासोबत संस्था कार्यरत आहे.

या वर्षातील शेवटचे कार्यक्रम म्हणजे नाताळ च्या सुट्टी मध्ये आयोजित केलेले हिवाळी शिबीर. या वर्षी BWNA २३ ते २५ डिसेंबर या तारखांमध्ये सातारा येथील किल्ले सर करणार आहे. गुणवंतगड, दातेगड, वसंतगड, मचिंद्रगड आणि सदाशिवगड असे ५ किल्ले, ३ तालुके आणि २ जिल्हे पालथे घातले जाणार आहेत. माणसाचे निसर्गाशी आपले नात आणि बांधिलकी जपावी हाच नववर्षासाठी BWNA चा संकल्प आहे.

Related posts

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील जनतेला करणार संबोधित

News Desk

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही !

News Desk