पुणे | २०१९ अखेर पुण्यात १२ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो मार्ग – ३चे भूमिपूजन करताना म्हणाले. पुढे मोदी असे देखील म्हणाले की, देशात ५०० किलोमीटर मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
Prime Minister Narendra Modi in Pune, Maharashtra: Metro is becoming the lifeline of cities of the country. In the last 4 years, the govt has extended this network to several cities and even more cities will be connected in the time to come. pic.twitter.com/mvQQBRxit4
— ANI (@ANI) December 18, 2018
डिजिटल इंडियासाठी बनवण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे. मोबाइल तयार करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. हे यश मागील काही वर्षांतील मेहनतीचे फळ आहे. येणाऱ्या काळात मेट्रोलाईन देशातील प्रमुख शहरांची लाइफलाइन होणार आहे. शिवाय, मेट्रोच्या कामामुळे वेळ, पैसा वाचून तरुणाची कार्यक्षमता वाढणार आहे, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा फुले, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचाही आपल्या भाषणात मोदींनी उल्लेख केला. कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.