HW News Marathi
राजकारण

#Results2018 : मिझोराममध्ये काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

नवी दिल्ली | काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट(एमएनएफ)ची सत्ता स्थापन होण्याची चिन्हे आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एमएनएफला २६ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एमएनएफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर नृत्याविष्कार सादर करत आनंद व्यक्त केला आहे. मिझोराममध्ये काँग्रेसचे ६ जागा मिळवित डिपॉझिट जप्त झाले आहे.

मिझोरामचे मुख्यमंत्री ललथहवला यांना सेरछिपमध्ये लालदूहोमा यांनी पराभवाचा धक्‍का बसला आहे. तर चंफाई दक्षिणमधून त्यांना एमएनएफच्याच केटी लालनंतलुआंग यांनी ८५६ मतांनी पराभूत केले. मिझोराममध्ये एकूण ४० सदस्यीय विधानसभेत जागा आहेत. ललथनहवला यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री वानलालवंपुई च्‍वांगथू या हरांगतुर्जो विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. एमएनएफचे अध्यक्ष जोरामथांगा हे एजॉल पूर्वमधून आघाडीवर असून जेपीएम नेते केके सापदांगा पिछाडीवर आहेत. जेपीएम हे दोन राजकीय पक्ष आणि चार समुहांची आघाडी आहे.

ललथनहवला यांनी गत निवडणुकीतही दोन जागांवरून निवडणूक लढवली होती. तेव्‍हा सेरछिप आणि हांगतुजरे या दोन्‍ही जागांवरून त्यांनी विजय मिळवला होता. १९७८ पासून सलग ९ वेळा ते विजयी झाले आहेत. परंतु, यंदाच्या निवडणुकीत ते एकही जागा वाचवू शकले नाहीत. २०१३ च्या निवडणुकीत ललथनहवला यांच्या नेतृत्‍वाखाली ४० पैकी ३० जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

म्हणून… राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही

News Desk

राहुल गांधींचे मोदींना दोन प्रश्न

News Desk

गेली अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाकिस्तानकडून पैसे घेतो !

News Desk
राजकारण

#Results2018 : मध्य प्रदेशमध्ये मायावती किंगमेकर ठरणार ?

News Desk

नवी दिल्ली | मध्य प्रदेशात काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. प्रत्येक सेकंदाला आघाडीचा आकडा बदलत आहे. मध्य प्रदेशात २३० विधानसभा सदस्य असलेल्या सभागृहात बहुमतासाठी ११६ चा आकडा आवश्यक आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार काँग्रेस ११०, तर भाजप १०८ जागांवर आघाडीवर आहे.

या चुरशीच्या लढाईत बहुमताचा आकडा गाठण्यास भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या पक्षांना अपयश आल्यास बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेशात आठ जागी बसप उमेदवार आघाडीवर आहेत.

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पैकी नक्की कोणत्या पक्षासोबत मिळून मायावती सत्ता स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. बसप आणि अपक्षांच्या वाट्याला जितक्या जागा जातील तितका अधिक फटका सत्ताधारी भाजप आणि सत्तेची स्वप्न पाहत असलेल्या काँग्रेससाठी असणार आहे. तर अपक्ष सहा ठिकाणी आघाडीवर आहेत.

Related posts

तासगावात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा जोरदार मोर्चा, नाराज गटाने मोर्चाकडे फिरवली पाठ ?

News Desk

‘रिव्हर अँथम’मुळे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या प्रदुषणमुक्त झाल्या ?

News Desk

मला १००० % विश्वास आहे कि टीडीपी विजयी होईल !

News Desk