HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले !

मुंबई | आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थित महाराष्ट्रातील वर्ध्यात पहिली जाहीर सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. “काँग्रेसने आपल्या देशाला तब्बल गेली ५० वर्षे एप्रिल फूल बनवले आहे. परंतु, आता ते लोकांना एप्रिल फूल बनवूच शकत नाहीत”, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे. आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींना शह देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसह एकत्र आलेल्या ५६ पक्षांनी लक्षात घ्यावे कि देश चालविण्यासाठी ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते”, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी भाजपसह अन्य मित्रपक्षांचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीसह एकत्र आलेल्या ५६ पक्षांनी लक्षात घ्यावे कि देश चालविण्यासाठी ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते
  • काँग्रेसने आपल्या देशाला गेली ५० वर्ष एप्रिल फूल बनवले आहे. परंतु, आता ते लोकांना एप्रिल फूल बनवू शकत नाहीत.
  • गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने विदर्भावर केलेला अन्याय मोदींमुळे दूर झाला. जे आघाडी सरकारने १५ वर्षात केले नाही ते आम्ही या ४ वर्षात विदर्भात केले आहे.
  • यंदा विदर्भातील सर्व १० जागा युतीच जिंकणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ होणार
  • गेल्या निवडणुकांच्या वेळी देखील नरेंद्र मोदी यांची सभा वर्ध्यातूनच झाली होती.
  • वर्धा ही महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. महात्मा गांधींनीच म्हटले होते कि, काँग्रेसला विसर्जित करा. त्यामुळे मोदींनी वर्ध्यातूनच काँग्रेसला विसर्जित करण्यास सुरुवात केली.
  • भाजपने लोकसभेत, विधानसभेत, जिल्हा परिषदेत इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीत देखील काँग्रेसला विसर्जित करण्याचे काम केले आहे.

Related posts

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची कविता

News Desk

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

News Desk

विधानपरिषदेच्या मतमोजणीला सुरुवात

News Desk