HW Marathi
राजकारण

काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

नागपूर | काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांनी केले आहे. काँग्रेसमुक्त भारत या मोदींच्या घोषणेवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दरम्यान, वसंत पुरके यांच्या या वक्तव्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा विदर्भात सुरू आहे. यावेळी नागपूर येथे झालेल्या सभेत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर मोठ्या प्रमाणावर टीका केली.

वसंत पुरके यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मुख्यमंत्री फडणवीस यांना शेकडो महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा राम रहीम अष्टपैलू वाटतो. फडणवीसांना माझा एक सल्ला आहे. त्यांनी राम रहिमला त्यांच्या घरी घेऊन जावं. बाबा तुम्हाला आपला एखादा तरी पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असे वादग्रस्त विधान पुरके यांनी केले आहे.

आगामी निवडणुकांच्या तयारीला लागलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु आहे. या आरोप-प्रत्यारोपांदरम्यान अनेकदा या राजकीय नेत्यांची जीभ वारंवार घसरते.

Related posts

राज्यातील सिंचन घोटाळ्याला अजित पवार जबाबदार !

News Desk

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk

शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला !

News Desk