HW Marathi
राजकारण

पुलवामा हल्ला नसून ती तर ‘दुर्घटना’

नवी दिल्ली | पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवाना शहीद झाले होते.  काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला नसून ‘दुर्घटना’ असल्याचे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. या वादग्रस्त विधानानंतर सर्व स्तरातून दिग्विजय यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या ट्विटमध्ये दिग्विजय यांनी म्हटले आहे,  “पुलवामा दुर्घटनानंतर भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही विदेशी मीडियांनी यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे भारताच्या विश्वसनीयतावर सवाल केले आहेत.”

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेने मंगळवारी (२६ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या हाद्दीत घुसून दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त केली. ज्या प्रकारे अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या कारवाईचे सबळ पुरावे संपूर्ण जगापुढे ठेवले होते. त्याचप्रमाणे आपणही आपल्या भारतीय वायू दलाने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबाबत करायला हवे”, असे विधान दिग्विजय यांनी केले होते.

“भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत मोदी सरकारने पाकिस्तानवर कारवाई केली होती.” भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी (३ मार्च) गुजरातमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

Related posts

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत प्रियांका चतुर्वेदी शिवबंधनात

News Desk

राज्यात शेतक-यांसाठीच्या कोणत्याही योजनांवर प्रभावी काम झालेले नाही !

News Desk

Budget 2019 LIVE Updates :  सोने,चांदी, पेट्रोल-डिझेल महागणार

News Desk