HW News Marathi
राजकारण

मुस्लीम समुदायाने एकजुटीने काँग्रेसला मतदान करून मोदींचा पराभव करा !

कटिहार | लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगाल आला असताना नेत्यांच्या भाषणबाजीकडे निवडणूक आयोगाचाही करडी नजर आहे. मुस्लीम समुदयाने एकत्र येवून एकजुटीने काँग्रेसला मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदीचा परावभ करावा, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे स्टार प्रचारक नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले आहे. सिद्धूच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

“मी तुम्हाल चेतावणी देण्यासाठी येथे आलो आहे. मुस्लिम समुदायामध्ये फूट पाडण्यासाठी मतांचे विभाजन करण्यासाठी एमआयएमसारखे पक्ष अस्तित्त्वात आले आहे. मुस्लीम समुदयाने एकत्र येवून एकजुटीने काँग्रेसला मतदान करून मोदींचा पराभव निश्चित होईल,” असे वादगस्त विधान नवज्योतसिंग सिद्धू यांनी केले आहे. बिहारच्या कटिहार येथील काँग्रेसच्या जनसभेला संबोधित करताना सिद्धू यांनी हे विधान केले आहे.

बसाचे सर्वेसवा मायावती, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपाचे नेता आझम खान आणि भाजप नेता मनेका गांधी या चारही दिग्गज नेत्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात वादग्रस्त विधान केल्यामुळे आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपाने आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Related posts

तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे

News Desk

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली शरद पवारांची भेट

News Desk

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

News Desk