HW News Marathi
राजकारण

काँग्रेसच्या नेतृत्त्वाला घराण्यांची परंपराच माहिती नाही, त्यांनी घराण्यांचा मान ठेवला नाही !

मुंबई | “सांगलीचे दादा घराणे, विखे-पाटील घराणे, मोहिते-पाटील आणि वाईचे भोसले या घराण्यांना काँग्रेसला मान ठेवता आला नाही. काँग्रेसला घराण्यांची कदर नाही. वर्षांनुवर्षे काँग्रेस ज्यांच्या जिवावर उभी राहिली उदा. सांगलीचे दादा घराणे अशांना काडीचाही मान देणे बंद करून टाकले. काँग्रेसच्या नेतृत्त्वाला घराण्यांची परंपराच माहिती नाही, दादा घराण्याने काय त्याग केला ? पक्ष कसा उभा केला ? राज्यात कसे काम केले ? ते यांना माहितीच नाही”, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

चंद्रकांत पाटील पुढे असे देखील म्हणाले की, “सांगलीसारखी जागा यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली. याचा अर्थ त्यांनी स्वत:च असे जाहीर करून टाकले की, सांगलीत काँग्रेसचा प्रभाव राहिलेला नाही. त्यामुळे दादा घराणे, विखे-पाटील घराणे, मोहिते-पाटील घराणे आणि वाईचे भोसले घराणे यांना असे लक्षात आले की, काँग्रेसमध्ये आपल्याला काही ही स्थान नाही. आपल्या घराण्यांची काँग्रेसला कदर नाही.”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप-शिवसेनेच्या अन्य वरिष्ठ नेत्यांची मंगळवारी (२६ मार्च) मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी ‘वर्षा’ येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी एच. डब्ल्यू मराठीच्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

 

 

Related posts

राहुल गांधी जम्मू-काश्मीरला रवाना, विमानतळावर रोखण्याची शक्यता

News Desk

प्रकाश आंबेडकरांच्या अल्प प्रतिसादामुळे विधानसभेतही काँग्रेस-राष्ट्रवादीच एकत्र !

News Desk

RamMandir : न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेत कायदा करा, उद्धव ठाकरेंचे मोदींना अल्टीमेटम

News Desk