HW News Marathi
राजकारण

भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये 7 नोव्हेंबरला येणार; अशोक चव्हाणांची माहिती

नांदेड | काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) 7 नोव्हेंबर रोजी नांदेडमध्ये येणार असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रा 7 ते 11 नोव्हेंबरदरम्या म्हणजे पाच दिवस राहणार आहे. तर राहुल गांधी ही नांदेडमध्ये 10 नोव्हेंबर रोजी नवा मोंढा जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहितीही चव्हाणांनी आज (1 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारत जोडो यात्रेत 9 नोव्हेंबर रोजी नायगाव येथे सहभागी होणारआहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भारत जोडो यात्रे सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक समविचारी पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर भारत जोडो यात्रे सहभागी होणार आहेत, अशी माहिती चव्हाणांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Related posts

स्वाभिमानासाठी नाॅट रिचेबल असणारे रविकांत तुपकर भाजपला रिचेबल .. तुपकरांचा स्वाभिमानीला रामराम !

News Desk

भटिंडामधील मतदान केंद्रावर गोळीबार

News Desk

लोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार

News Desk