HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षे महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले !

मुंबई | जोपर्यंत राज्यातील अंतिम शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरु ठेवण्याबाबत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटले आहे.  “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने १५ वर्षे महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल ७२,००० हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला. तर भाजपने सिंचन क्षेत्रात मोठे काम केले”, असेही शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह सांगलीत संजय पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

“काँग्रेसकडून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची भाषा केली जात आहे. मात्र, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कोणीही काश्मीरला भारतापासून वेगळे करू शकत नाही”, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. यावेळी एअर स्ट्राईकवरून भाजपवर विरोधकांकडून वारंवार होणाऱ्या टीकेवर देखील अमित शाह यांनी यावेळी भाष्य केले आहे. “भारतीय वायू दलाने एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला घरात घुसून मारले. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सैन्याच्या या कारवाईचे पुरावे मागितले जात आहेत. दहशतवादासाठी भाजपचा कायमच झिरो टॉलरन्स आहे”, असे अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

News Desk

मुख्यमंत्र्यांना दादाची ट्यूशन लावावी लागेल- राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मुख्यमंत्र्यावर हल्ला

Ramdas Pandewad

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar