HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनो, तुमच्या नसानसांत देशप्रेम आहे कि नाही ?

मुंबई | “पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारत होते कि शरद पवार तुम्हाला काही वाटतं कि नाही ? परंतु मी म्हणतो कि शरद पवारांचे सोडा. त्यांना लाज, लज्जा, शरम नाहीच आहे. माझा प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांसाठी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांनो, तुमचा भाजप-शिवसेना द्वेष मी समजू शकतो. परंतु, तुमच्या नसानसांत देशप्रेम आहे कि नाही ?” असे सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ते बुलढाण्यातील सभेत बोलत होते.

सोनिया गांधींनी शरद पवारांना लाथ मारून बाहेर काढले | उद्धव ठाकरे

“तुम्ही तुमची ५० वर्षांची कारकीर्द काढा. शरद पवारांची सुद्धा २५-३० वर्षे काढा. कधी वसंतरावांच्या पाठीत वार केला, कधी यशवंतरावांना फसविले, कधी राहुल गांधींना शिव्या घालून बाहेर पडले, कधी सोनिया गांधींवर टीका केली म्हणून सोनिया गांधींनी त्यांना लाथ मारून बाहेर काढले. बाहेर काढून सुद्धा खुर्चीसाठी लाचार होऊन पुन्हा सोनियांच्या दारी गेले”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका करताना टोकाची भाषा वापरली आहे.

देशद्रोह्यांना फासावर लटकविल्याशिवाय राहणार नाही

“तुम्ही ‘भारत माता कि जय’च्या घोषणा देऊ शकता कि नाही ? जर तुम्ही या घोषणा देत असाल तर देशाच्या छाताडावर बसून देशद्रोह करणारा तुम्हाला चालेल ? जो कोणी देशद्रोही असेल त्याला आम्ही फासावर लटकविल्याशिवाय राहणार नाही, ही भाजप-शिवसेनेची शपथ आहे”, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचप्रमाणे विशेषतः शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.

Related posts

एमएमआरडीएचा विस्तार होणार, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

News Desk