HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात काँग्रेसची पोस्टरबाजी, राहुल राम तर मोदी रावण

नवी दिल्ली | मध्य प्रदेशात काँग्रेसकडून आज (८ फेब्रुवारी) लावलेल्या पोस्टरची मोठी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मध्य प्रदेशात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावणाच्या रुपात तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना रामाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. राहुल गांधी मोदींच्या दिशेने बाण सोडण्यास सज्ज झाले असल्याचे या पोस्टरवर दाखविण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘चोरो तुम्हारी खैर नहीं, हम राम भक्त है, चोरों के अलावा किसी से बैर नहीं’, असे मधोमध तर सर्वात शेवटी ‘चौकीदारही चोर है’ असा मजकूर छापण्यात आला आहे.

काँग्रेसने मध्य प्रदेशात पोस्टर लावत भाजप आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले असून त्यांना दाखविण्यात आलेल्या दहा तोंडांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे चेहरे दाखविण्यात आले आहेत. दरम्यान, भाजपकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युतीनंतर सेनाभवनात शिवसेना नेत्यांची पहिली बैठक

News Desk

मराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप

Aprna

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

News Desk