HW News Marathi
राजकारण

#MeToo : एम. जे. अकबरांवर आणखी एका महिला पत्रकाराचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | भाजपचे नेते एम. जे. अकबर यांच्यावर आता अमेरिकेहून आणखी एका महिला पत्रकाराने आरोप केले आहेत. या महिला पत्रकाराचे नाव पल्लवी गोगोई असे आहे. पत्रकार पल्लवी यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत लिहिले आहे. मात्र, आपण याबाबत पोलिसांकडे तक्रार केली नसल्याचे पल्लवी यांनी या लेखामध्ये म्हटले आहे.एम. जे. अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांना विरोधकांच्या दबावामुळे परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

२३ वर्षांपूर्वी भारतीय पत्रकार पल्लवी गोगोई या एशियन एजमध्ये काम करत होत्या. यावेळी अकबर प्रसिद्ध संपादक होते. पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, अकबर यांच्या केबिनमध्ये पल्लवी संपादकीय पान दाखविण्यासाठी गेल्या होत्या. “ते मला मदत करतील अशी माझी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी माझे चुंबन घ्यायला सुरवात केली. मला धक्काच बसला. मी लगेचच ऑफिसमधून निघाले,” असे पल्लवी यांनी त्या लेखात म्हटले आहे. ही घटना १९९४ सालची आहे.

त्यानंतर काहीच महिन्यांनी मुंबईमध्ये एका मॅगझीनच्या प्रकाशनाच्या वेळी देखील अकबर यांनी ताज हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीची सजावट पाहण्यासाठी पल्लवी यांना बोलावले होते. तेथेही त्यांनी पुन्हा चुंबन घेतले. त्यावेळी देखील आपली आपण कशीबशी मी सुटका करून घेतल्याचे, पल्लवी यांनी सांगितले आहे. जयपूरमध्ये देखील त्यांनी पल्लवी यांनी हॉटेलच्या खोलीत बोलावले होते. पल्लवी दबावामुळे त्यांच्या खोलीत गेल्या. मात्र, त्यावेळी अकबर यांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप पल्लवी यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडून तक्रार दाखल

News Desk

मोदींचा शपथविधी सोहळा देशाला मजबुतीकडे नेणारा ठरेल ही ईश्वरी योजनाच !

News Desk

“सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंना बदनामी करण्याचा राणेंचा प्रयत्न,” केसरकरांचा गंभीर आरोप

Aprna