HW Marathi
राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे खोटे बोलतात !

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी आज (११ फेब्रुवारी) दिल्लीमध्ये एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. चंद्राबाबू यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नायडूंची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा देत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राहुल गांधी यांनी “मी आंध्र प्रदेशच्या लोकांसोबत उभा आहे. मोदी हे कोणत्या प्रकारचे पंतप्रधान आहेत ? आंध्र प्रदेशच्या लोकांना दिलेले आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे ते खोटे बोलतात. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. मोदींनी राफेल विमान खरेदीत घोटाळा केला. चौकीदार चोर है’,” असे बोलत राहुल यांनी मोदींवर आरोपाच्या फैऱ्या साडल्या आहे.  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि जम्मू-काश्मीचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी भेट घेऊन चंद्राबाबू नायडू यांना एक दिवसीय उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

 

Related posts

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी

News Desk

जर तुमच्या पतीने एनडीएला मत दिले नाही तर त्यांना जेवायलाच देऊ नका !

News Desk