नवी दिल्ली | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते डॉ. संजय सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संजय सिंह यांनी काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे संजय सिंह यांनी राज्यसभा खासदारचा राजीनामा सुपूर्त केला आहे. तसेच सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Congress Rajya Sabha MP, Sanjay Singh: Congress is still in the past, unaware of the future. Today, country is with PM Modi & if the country is with him, I’m with him. I will join BJP tomorrow. I have resigned from the party, as well as my membership of Rajya Sabha. pic.twitter.com/waAuPdFu9A
— ANI (@ANI) July 30, 2019
राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असतानाच काँग्रेस नेते संजय सिंह यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यसभेतील मतांचे गणितही बदलणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सिंह यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेचे संख्याबळ २४० पवर आले आहे. २४५ सदस्य असलेल्या या सभागृहातील चार जागा आधीच रिक्त होत्या. त्यात आला अजून एका जागेची भर पडली आहे. सिंह यांच्या पाठोपाठा त्यांची दुसरी पत्नी अमिता सिंह या देखील लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सिंह यांनी प्रसारमाध्यमांना देताना सांगितले. संजय सिंह यांची पहिली पत्नी गरिमा सिंह अमेठी विधानसभा मतदारसंघातून भाजपमध्ये आमदार आहे.
संजय सिंह यांनी लोकसभा निवडणुकीत सुल्तानपूरमधून मनेका गांधी विरोधात लढले होते. परंतु सिंह यांचा गांधी यांनी दारुण पराभव केला आहे. सिंह यांना काँग्रेसने आसाममधून राज्यसभेवर पाठवले होते. १९८० मध्ये जेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संजय सिंह यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.