HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे

औरंगाबाद | काँग्रेस पक्षाने औरंगाबादमधून लोकसभा मतदारसंघातून आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु सत्तार यांनी आज (८ एप्रिल) त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे.

सत्तार यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती.  या भेटमुळे सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत ३ एप्रिलला सत्तार यांची बैठक झाल्याने चर्चेला पुन्हा एकदा  उधाण होते. सत्तार यांनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे राहत आहेत.

 

 

Related posts

संपूर्ण देशाला माहिती आहे कि देशाचा चौकीदार चोर आहे !

News Desk

चंद्रकांत पाटील – ‘जन्माला यावे तर कर्नाटकात’

Pooja Jaiswar

उद्धव ठाकरेंचे भाषण समजावून सांगणाऱ्याला मनसेकडून बक्षीस जाहीर

News Desk