HW News Marathi
राजकारण

HW Exclusive : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीदरम्यान भाजपकडून पैशाचे वाटप?, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

मुंबई | शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या (Andheri East Assembly By-Election) जागेवर आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाला दिवसभरात मतदारांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला.  अंदाजे साधारण 30 टक्के मतदान झाले. मात्र, अगदी शेवटीचे काही तास शिल्लक असताना मतदान प्रक्रियेत वाद झाला. हा वाद म्हणजे भाजप कार्यकर्त्यांकडून नोटाचा प्रचार होत असल्याचा आरोप शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. या भाजपच्या कार्यकर्त्यांना महिलांनी समजले असून पोलिसांकडे देखील यासंदर्भात माहिती दिल्याची त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीला सांगितले.

 

दरम्यान, यासंदर्भात ईटीव्हीशी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मनिषा पांचाळ म्हणाल्या, “आम्ही आमच्या प्रभागातील पोलिंग बूथवर दिवसभर फेऱ्या मारत आहोत. अंधेरी भागातील लोकांना आवाहन करत आहोत की,  त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. प्रत्येकाला आपले मतदान करण्याचा हक्क बजावावा. यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या आम्ही घरोघरी जाऊन लोकांना आवाहन करत होतो. मात्र, घरोघरी फिरताना आमच्या काही महिला कार्यकर्त्यांना भाजपचे काही कार्यकर्ते लोकांच्या घरी जाऊन नोटाला मतदान करा, असे सांगताना आढळले.” असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

मतदारांना भाजप कार्यकर्त्यांकडून पैशाचे वाटप 

पुढे मनिषा पांचाळ बोलताना म्हणाल्या, “सुरुवातीला आम्ही भाजपच्या त्या कार्यकर्त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते काही आमच्या तावडीतून सूटले. मात्र, जेव्हा आम्ही साईवाडी या परिसरात आलो. तेव्हा जवळच असलेल्या साई मंदिराच्या परिसरात ही लोक बसली होती. आम्ही भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडले. यावेळी या कार्यकर्त्यांकडे आम्हाला अनेक फायली, काही कागद मिळाले. या पेपर्समध्ये त्या भागात राहणाऱ्या मतदारांची नावे होती. त्यासमोर त्यांची मोबाईल नंबर होते. तसेच ज्या लोकांनी नोटाला मतदान केले आहे, अशा लोकांच्या नावासमोर टिकमार्क करण्यात आली आहे. या टिकमार्कचा अर्थ असा की, या लोकांनी नोटाला मतदान केले आहे. आणि या लोकांना हजार रुपये देणे आहे. एका मता मागे या लोकांनी हजार रुपये दिले आहेत.” असा थेट आरोप शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी ईट विभागाची बोलताना केला आहे.

निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ

याबाबत आणखी माहिती देताना माजी नगरसेविका पांचाळ सांगतात की, “या सर्व प्रकाराची माहिती आम्ही पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी त्यांना फक्त समज दिला असून खरेतर सुरुवातीला हा सर्व प्रकार आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही या लोकांना तात्काळ समज दिला होता. मात्र, समोरच्याच भाजपच्या कार्यकर्त्यांनी 100 नंबरला फोन करून आमच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आम्हाला संपर्क साधला आमची भेट घेतली आणि चौकशी केली. मात्र, इथे घडलेली हकीकत आम्ही पोलिसांना सांगितली. पोलिसांनी या साईवाडी मंदिराच्या परिसरात थोडी शोधाशोध केली त्यांना देखील इथे अनेक फाईल मिळाल्या. आता पोलीस म्हणतात की, “हे सर्व प्रकरण तुम्ही निवडणूक आयोगाकडे न्या. आता उद्या जर काही मतांमध्ये फरक आढळल्यास यावर निवडणूक आयोग नेमकी काय कारवाई करणार? काय भूमिका घेणार?” असा सवाल देखील या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

टीप – या व्हिडिओमध्ये केलेल्या सर्व आरोपाची सत्यता पडताळणी HW न्यूज नेटवर्कने केलेली नाही.

Related posts

भूमिपूजनापूर्वीच शिवस्मारकाच्या खर्चात १००० कोटींची वाढ

News Desk

“वाचाळवीरांना आवरा…”, मंगलप्रभात लोढांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा टोला

Aprna

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून श्रीकांत शिंदेंचे भावनिक पत्र

Aprna