लखनऊ | पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२९ डिसेंबर) उत्तर प्रदेशच्या गाजीपूर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी वाराणसीच्या आधी गाजीपूरचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराजा सुहेलदेवचे डाक तिकीट जारी केले. यावेळी आरटीआय मैदानावर लोकांना संबोधित करीत असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या कर्जमाफीच्या वचनावर निशाणा साधला आहे.
#PMInGhazipur: Karnataka mein laakhon kisaano ka karz maafi ka vaada kiya tha lekin sirf 800 kisaano ka karz maaf hua. Ye kaisa khel hai, kaisa dhoka hai? pic.twitter.com/JtIj2W3noD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 29, 2018
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “कर्नाटकमध्ये काँग्रेसने कर्जमाफीची घोषणा करून लोकांची मते चोरली आणि सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ ८०० शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. हा कोणता खेळ आहे, हा कोणता विश्वासघात आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले. त्यांनी स्वामिनाथन आयोगाची शिफारस लागू केली नाही. आमच्या सरकारने ही शिफारस लागू केली.”
#PMInGhazipur: Aane wala samay aapka hai, aapke bachhon ka hai. Aapka aur aapke bhavishya sudhaarne ke liye aapka ye chaukidar bohot imaandari se, bohot lagan ke saath, din raat ek kar raha hai pic.twitter.com/V3NEqscJX5
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 29, 2018
“गाजीपूरमध्ये नवे मेडिकल कॉलेज, गोरखपूरमध्ये एआयआयएमएस, वाराणसीमध्ये आधुनिक रुग्णालय, जुन्या रुग्णालयाचा विस्तार असो ही सर्व कामे आता लवकरात लवकर पूर्ण होतील. आज देशातील गरिबातील गरीब व्यक्तीसाठी आपल्या समस्या सरकारपुढे मांडण्याचा मार्ग खुला आहे. त्याचप्रमाणे त्यांना सन्मानाचे जीवन देण्यासाठीच्या अभियानाची ही सुरुवात आहे,” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “येणारी वेळ ही तुमची आहे, तुमच्या मुलांची आहे. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुमचा चौकीदार खूप प्रामाणिकपणे, खूप कष्ट करून दिवसरात्र एक करीत आहे”, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.