नवी दिल्ली । जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याल्यानंतर सरकारच्या निर्माण विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याची पाकिस्तानच्या संसदेत प्रशंसा होते. राहुल गांधींच्या त्या वक्तव्याचा वापर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघात सादर केलेल्या याचिकेत केला गेला. यामुळे काँग्रेसला यांची थोडी तरी लाज वाटायला हवी, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली.
Amit Shah,Home Minister: Congress has opposed abrogation of Article 370.Even today,statement Rahul Gandhi gives is being praised in Pakistan.His statement has been included in Pakistan's petition at UN.Congress should be ashamed that their statements are being used against India. pic.twitter.com/KkPUAStX4n
— ANI (@ANI) September 1, 2019
केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेलीतील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सहा पुढे म्हणाले, आम्ही हे विचारू इच्छितो की, तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करू इच्छित आहात? कलम ३७० वरून देशाची जनता ठामपणे पंतप्रधान मोदींबरोबर उभी आहे. कलम ३७० आणि ३५-ए हे देशाच्या एकतेतील धोकादायक होते. मोदींना देशाने पुन्हा पंतप्रधान बनवले व त्यांनी संसदेच्या पहिल्याच सत्रात कलम ३७० हटवले. मोदींशिवाय हे काम कोणीच करू शकत नव्हते. त्यांनी यावेळी जेएनयूत देशविरोधी घोषणाबाजीचे प्रकरण असो किंवा मग सर्जिकल स्ट्राइक व एअर स्ट्राइक असो काँग्रेसने अशा गंभीर मुद्यांवर सरकारविरोधी भूमिका घेतलेली आहे.
Amit Shah, Home Min: With this decision of removal of #Article370, road for development has opened in J&K.The last nail in the coffin of terrorism has been put,task of integrating J&K with India has been done.Everyone is with govt on this decision but some people are opposing it. pic.twitter.com/gS5EVwyReq
— ANI (@ANI) September 1, 2019
७० वर्षे देशात अनेक पक्षांचे सरकार होते. त्यांनी ३७० हटविले नाही. आता हे कलम हटविण्यात आल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे मार्ग उघडले आहे.कलम ३७० हटवण्यात आल्यापासून या ठिकाणी शांततेचे वातारण आहे. या निर्णयापासून ते आतापर्यंत एकही गोळी चाललेली नाही, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या नाहीत. कोणालाही जीव गमवावा लागलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.