HW News Marathi
राजकारण

दिवाळी पहाट कार्यक्रमाला पूर्व उपनगरात उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई | दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून, नवीन कपडे घालून, नटूनथटून रसिक प्रेक्षागृहात दाखल होतात. पूर्व नगरातील प्रारंभ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला पूर्व उपनगरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पहाटे अभ्यंगस्नान करुन नवीन पारंपरिक कपडे घालून घरातून निघालेल्या पूर्व उपनगरातील तरुण-तरुणी पूर्वी डोंबिवली येथील फडके रोड तसेच ठाणे येथील तलावपाली येथे हा दिवस साजरी करण्यास जात होते. यामुळे पूर्व उपनगरात देखील हा दिवाळी पहाट साजरी व्हावी यासाठी विक्रोळी येथे प्रारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ६ वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरवात झाली. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. सकाळी सुगम संगीताने या कार्यक्रमाला झाली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उपस्थित तरुणाईने मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदविला. खासदार किरीट सोमय्या यांनी ही या कार्यक्रमला हजेरी लावली होती. तरुणाई ला सेल्फीचे क्रेझ बघता आय लव्ह विक्रोळी या नावाने सेल्फी पॉइंट बनवण्यात आला होता. या सेल्फी पॉइंटवर फोटो काढायला ही तरुणाईने गर्दी केली होती. आपली हिंदू संस्कृती जपण्यास हातभार म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात येणार ते युतीचेच सरकार !

News Desk

उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह राजेंद्र भागवत यांना पुसद न्यायालयाने जारी केले वॉरंट

News Desk

मालिकांचा वापर करून छुपा प्रचार करण्याचे भाजपचे मायावी तंत्र, काँग्रेसचा आरोप

News Desk