HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जातोय | अशोक चव्हाण

नांदेड | भाजप सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तेव्हा जनतेने विचारपूर्वक मतदान करा, असे भावनिक आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकांमधील नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मतदारांना केले आहे.

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. दोन्ही सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस असलेल्या ठिकाणांची विकास कामे रोखत असून सरकार मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु मी तुमचा आहे, मी तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, असे भावनिक आवाहन अशोक चव्हाणांनी मतदारांना घातली आहे. नांदेडमधील भोकरमध्ये आयोजित केलेल्या सभेत ते चव्हाण बोलत होते.

पक्षातील एखादा कार्यकर्ता चुकीचे वागत असेल, तर मी निवडणुकीनंतर त्यांना शिक्षा करेन, परंतु तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर काढू नका, त्यांच्यावरील रागाची शिक्षा मला देऊ नका, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघात केले. त्यामुळे चव्हाणांच्या काँग्रेस पक्षाकडेही रोख दिसून आला.

लोकसभा निवडणूक लढवण्यास अशोक चव्हाण फारसे उत्सुक नव्हते. परंतु प्रदेशाध्यक्षांनीच निवडणूक लढवली नाही, तर चुकीचा संदेश जाईल, या विचाराने चव्हाणांना निवडणूक लढवण्याचे आदेश हायकमांडनी दिले. २०१४ साली राज्यात काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते. अशोक चव्हाण हे पुन्हा रिंगणात उतरलेले काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे बालेकिल्ल्यात निवडणूक लढवतानाच पक्षाची इभ्रत वाचवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर आहे.

Related posts

प्रयागराजमध्ये सर्व भाविक अक्षयवट आणि सरस्वती स्तंभाचे दर्शन करू शकणार !

News Desk

देशाला फसविणाऱ्या लोकांना मोदी सरकार मदत करते!

अपर्णा गोतपागर

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

Ramdas Pandewad