HW News Marathi
राजकारण

काँग्रेसकडून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली | राफेल विमान खरेदी कराराबाबत काँग्रेसने कायमच भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विविध आरोप केले आहेत. याच आरोपांच्या विरोधात आज (१९ डिसेंबर) भाजपकडून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, भाजपच्या या मोर्चाला सुरुवात होण्याआधीच काँग्रेसकडून भाजपविरोधी पोस्टरबाजी करण्यात आली होती. काँग्रेसकडून “राफेल चोरांचे हार्दिक स्वागत” अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले होते.

काँग्रेसकडून राफेल कराराबाबत भाजप सरकारवर केलेल्या विविध आरोपांच्या विरोधात भाजपचे नेते आणि आमदार राज पुरोहित यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज भाजप कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून हा मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान, हा मोर्चा सुरु होण्याआधीच काँग्रेसने “राफेल चोरों का हार्दिक स्वागत” असे लिहिलेले पोस्टर्स लावून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर भाजपकडून राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. तसेच राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी देखील मागणी करण्यात आली. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत पुन्हा मोदी सरकारविरोधी आक्रमक भूमिका घेतली.

रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबूंच्या उपोषणादरम्यान एकाची आत्महत्या

News Desk

“सुषमा अंधारे कोण?”, असा सवाल करत प्रताप सरनाईकांची टीका

Aprna

काँग्रेसकडून चंद्रपूर मतदारसंघासाठी बांगड यांच्याऐवजी धानोरकर यांना उमेदवारी

News Desk