HW News Marathi
राजकारण

“महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू”, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर लोकसभेत खडाजंगी

मुंबई | “गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्यव्य करत आहेत”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बेळागावत महाराष्ट्रातील वाहने आणि नागरिकांवर झालेल्या हल्ल्यावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) पडसाद पडलेले दिसून आले. संसदेचे हिवाळी अधिवेशन आज (7 डिसेंबर) सुरू झाले. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुण्याहून बंगळुरूकडे जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके (Kannada Rakshana Vedike )या संघटनेने बेळगावच्या (Belgaum) हिरेबागेवाडी टोल नाक्यावर गाड्यांची तोडफोड करत आंदोलन केले होते. या प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी अधिवेशनात कर्नाटकच्या भूमिकेवर टीका करताना कर्नाटकच्या खासदारांसह खडाजंगी झाली.

सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद म्हणाल्या, “महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसापासून एक नवीन प्रश्न उभार राहिला आहे. आमच्या बाजूचे जे कर्नाटक राज्य आहे. कर्नाटकांचे मुख्यमंत्री वाईफळ वक्तव्य करत आहे. काल तर हद्दच केली, कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राचे लोक जाणार होते. त्यांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्र तोडण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्यव्य करत आहेत. आणि दोन्ही राज्यात भाजपची सरकार आहे. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आहे. कर्नाटकात देखील भाजपचे सरकार आहे. कर्नाटकाचे जे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राविरोधात बोलत आहेत. काल महाराष्ट्राच्या लोकांना मारहाण करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेला मारण्यात आले. हे आम्ही खपवून घेणार नाही. देश एक आहे. मी अमित शहा यांना विनंती करते की, त्यांनी यावर काही तरी बोलावे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री हे असत्य बोलत आहेत,” सुप्रिया सुळे लोकसभेत बोलत असताना सभागृहात गोंधळ सुरू होता.”

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर कर्नाटकचे खासदार म्हणाले…

सुप्रिया सुळेंचे सभागृहात बोलत असताना कर्नाटकच्या वर्तनावर विरोधक घोषणाबाजी होती. यावेळी सभागृहात कर्नाटकातील हवेरी मतदारसंघाचे भाजपचे खासदार शिवकुमार उदासी यांनी उभे राहून बोलण्यास सुरुवात केली की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. यामुळे लोकसभेच्या सभापतींना विनंती केली की, महाराष्ट्रातील कोणत्याही सदस्यांना महाराष्ट्र-कर्नाटक मुद्यांवर बोलण्याची परवानगी देऊ नका, असे म्हणाले. पुढे शिवकुमार उदासी हे सुप्रिया सुळे विरोधात बोलताना म्हणाले, ” लिंगो कल्चरल सिंड्रोम झाला आहे. जेव्हा हे सत्तेतून बाहेर होतात, तेव्हा ते असे वर्तन करतात.”

दोन राज्यांचा विषय, यात केंद्र सरकार काय करणार ?

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी देखील सभागृहात बोलण्यास सुरुवात केली. विनायक राऊत म्हणाले, “सुप्रिया सुळेंनी जो विषय मांडलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलिंबित असताना. बेळगाव, कारवार, निपान येथे मराठी भाषिकांवर ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार अन्याय आणि अत्याचार करते. ऐवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना सुद्धा बेळगावमध्ये प्रवेश बंद केला आहे. आपल्या देशामध्ये अशा पद्धतीने एका राज्याच्या मंत्र्यांना बंदी करणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. ज्या पद्धतीने कर्नाटकच्या पोलिसांकडून मराठी भाषिकांवर अन्याय आणि अत्याचार केला जात आहे. मराठी भाषिकांवर तोडफोड करण्याचे राजकारण सुरू आहे.” सभागृहात गोंधळ सुरू असताना लोकसभा पती ओम बिर्ला यांनी म्हणाले की, “तुमच्या कोणाचेही संभाषण रिकार्डमध्ये नसणार नाही. हा संवेधनशील विषय आहे. हा दोन राज्यांचा विषय आहे. यात केंद्र सरकार काय करणार ?, हे संसद आहे.”

 

 

Related posts

दलितांवर खुनी हल्ला करणाऱ्यांना फाशीची शिक्षा करा

News Desk

‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल

News Desk

शिवसेनेत हिंमत असेल तर मुंबईत ओवेसींना अडवून दाखवावे !

News Desk