June 26, 2019
HW Marathi
राजकारण

उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू !

बारामती | नीरा- देवधरच्या पाण्यावरून भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडीत पकडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून नियमबाह्यपणे बारामतीला वळवण्यात आलेले नीरा देवधरचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने बुधवारी (१२ जून) पाणी बंद करण्याचा अध्यादेश काढला. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच मोठे वादळ निर्माण होणार असल्याचे पहायला मिळत आहे.

नीरा देवधरच्या पाणी वाटपावरून राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची पाठ थोपटताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे उदयनराजे यांच्या या वक्तव्याने संतापलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी “उदयनराजेंना आवरा, अन्यथा आम्ही पक्षातून बाहेर पडू”, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे.

“भाजपने नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वात बारामतीला जाणारे अनियमित पाणी वळविण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे”, असे विधान उदयनराजे यांनी केले होते. “नीरा डाव्या कालव्याचा अध्यादेश काढण्यासाठी विलंबच झाला आहे. खरंतर, हा अध्यादेश आघाडीच्या कार्यकाळातच काढायला हवा होता”, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले. या पार्श्वभूमीवर “शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात मी पवारांना सांगणार आहे कि तुमच्या खासदाराला आवरा नाहीतर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत”, असा इशारा रामराजे यांनी दिला आहे.

Related posts

लोकसभेत काही ठिकाणी राष्ट्रवादीने आघाडीविरोधात काम केले !

News Desk

लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी संतोष गंगवार यांची नियुक्ती

News Desk

ममता बॅनर्जी या हिरण्यकश्यपूच्या कुटुंबातील !

News Desk