नवी दिल्ली | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांना पुन्हा प्रभू रामचंद्रांची आठवण झाली आहे. देशभरात सध्या राम मंदिराच्या मुद्यावरुन प्रचंड राजकारण सुरु असताना पहायला मिळत आहे. राम मंदिर उभारणीच्या मागणीवरुन राजकीय नेतेमंडळी मोठ-मोठी आणि वादग्रस्त विधाने करताना दिसत आहेत.
देशभरात राम मंदीराच्या मुद्याचे राजकारण होत असताना दरम्यान, भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनीही राम मंदिरासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. साक्षी महाराज यांनी नवी दिल्लीतील जामा मशिद तोडण्याचे आव्हान केले आहे. इतकेच नाही तर मशिदीच्या पायऱ्यांमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती आढळतील, असा दावाही साक्षी महाराजांनी केला आहे.
#WATCH: BJP MP Sakshi Maharaj says in Unnao "Rajneeti mein jab aaya to pehla mera statement tha Mathura mein, Ayodhya Mathura Kashi ko chhodo Dilli ki Jama Masjid todo, agar seedhion mein murtiyaan na nikle to mujhe faansi pe latka dena." (22.11.2018) pic.twitter.com/9pywDQ2flB
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 24, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.