HW News Marathi
राजकारण

२०१४ सारखी लाट निर्माण करणे सध्या कठीण | प्रशांत किशोर

पाटणा | पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत, मात्र २०१४ सारखी लाट निर्माण करणे सध्या कठीण असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे विधान २०१४ च्या निकडणुकीत मोदी लाट निर्माण करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी केले आहे. प्रशांत किशोर आता जनता दल संयुक्तचे (जेडीयू) उपाध्यक्ष आहेत. किशोर यांनी एका इंग्रजी दैंनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करील मत व्यक्त केले आहे. सद्यस्थितीतही भाजपच आघाडीकर आहे मात्र निकडणुकी अवघे १० ते १२ दिकसांमध्येही पलटू शकतो, असेही ते म्हणाले.

आरएलएसपीचे दोन आमदार सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे नितीश कुमारांच्या पक्षात सहभागी होणार आहेत. हे दोघे जर नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेश केला तर त्यामुळे राष्ट्रीय लोक समता पार्टी (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाह यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहेत.

सुधांशू शेखर आणि ललन पासवान हे उपेंद्र कुशवाह यांची साथ सोडू शकतात. तर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील शाब्दिक चकमकीवर लोक जनशक्ती पक्षाच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी दोघांनाही एनडीएच्या मर्यादेची जाणीव करून दिली होती. नितीश कुमार काहीही चुकीचं बोलतील, असे वाटत नसल्याचं चिराग पासवान म्हणाले आहेत. तसेच उपेंद्र कुशवाह यांनाही हा वाद वाढवू नका, असे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधींना बजावली नोटीस

News Desk

प्रियांका गांधी गंगेचे पाणी पिऊ शकल्या इतकी गंगा स्वच्छ आहे !

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारच्या 18 आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; ‘या’ नेत्यांना मिळाली संधी

Aprna