HW News Marathi
राजकारण

केजरीवालांवर ६ कोटींना लोकसभेचे तिकीट विकल्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | देशातील लोकसभा निवडणुकांचा सहावा टप्पा उद्या (१२ मे) पार पडेल. दरम्यान, त्याच्या काहीच तासांपूर्वी आता एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ६ कोटी रुपयांना लोकसभेचे तिकीट विकल्याचा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर करण्यात आला आहे. आपचे पश्चिम दिल्लीचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखड यांनी याबाबत दावा करत असे म्हटले आहे कि, “माझ्या वडिलांनी ३ महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. त्यांना उमेदवारीसाठी अरविंद केजरीवाल यांना ६ कोटी रुपये द्यावे लागले.” इतकेच नव्हे तर केजरीवाल यांनी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा सबळ पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा देखील उदय जाखड यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्याला मुख्यमंत्री देखील राहणार उपस्थित

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

News Desk

भाजपला संविधानाला हातही लावू देणार नाही

News Desk