HW News Marathi
राजकारण

“दादा, तुमचे ऐकत होते म्हणून तर ते आमचे ऐकत नव्हते…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला

मुंबई | “दादा, तुमचे ऐकत होते म्हणून तर ते आमचे ऐकत नव्हते.  तोच तर प्रॉब्लेम होता ना. प्रॉब्लम तिथेच सगळा झाला”, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (ajit pawar) यांना सभागृहात लगावला आहे. राज्याचे पावसाळी अधिवशेन सुरू असून राज्यात आज (22 ऑगस्ट) पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “अध्यक्ष महोदय, मी बील सोडून बोलत नाही. बीलावर जे जे बोललेत, त्यांना हे माझे उत्तर आहे. मी बलकुल बिल सोडून बोलणार नाही. त्यामुळे कुणी कुणाच्या खांद्यावर  बंदूक ठेऊन निशाणा साधला. कोणी कोणी रिमोट चालविले, हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळे माहिती आहे. दादा आता बोलणार नाही, पण खाजगीमध्ये सर्व बोलत होते. ते मला एकदा बोलले होते, त्यांनी मला कानात सांगितले तर मी बोललो असतो. पण, दादा ते तुमचे ऐकत होते म्हणून तर ते आमचे ऐकत नव्हते.  तोच तर प्रॉब्लेम होता ना. प्रॉब्लम तिथेच सगळा झाला. त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या ते सगळे जाऊ द्या. बघा आता मंजूर करा, याचा अर्थ का?, त्यांना मला आणखी पुढे ऐकायचे नाही.”

यानंतर विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “मुख्यमंत्री महोदय, तुम्ही अजून दोन मिनिटे बोला म्हणजे पुढचे बील, असेच मंजूर होईल, अध्यक्ष असे म्हटल्यानंतर सभागृहात एकच हर्षा पिकला. जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. विरोधी पक्ष नेत्यांचा मान-सन्मान ठेवून आम्ही कुठलेही बहुमताच्या जोरावर काम करणार नाही. आम्ही दोघांनीही ठरविले आहे. देवेंद्रजी आणि मी ठरविले आहे. पण एक आहे. काही लोक दोर तिकडे बाहेर एक शब्द दुसरा मुद्दाच नाही. दोनच शब्द आहेत. तिसरा मुद्दा आहे का?, बलकुल नाही. परवा काय ताट वाटी चलो गुवाहाटी, धनंजय मुंडे पण तिकडे होते. ऐवढ्या जोरात बोलत होते, किती ते किती वर्षाचे शिवसैनिक आहेत. ते असे बोलत होते, तुमचा घसा खराब होईपर्यंत बोलत होता. आता तुमचा पण सगळा प्रवास मला माहिती आहे. मला सगळा प्रवास माहिती आहे. आता त्यावेळीस देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखविली. त्यामुळे तुम्ही…कसे आहे. पण, परत परत दाखविता येणार नाही. त्यामुळे एक आहे, मी कमी बोलतो.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोलीत मतदान करून परतणाऱ्या मतदारांचा भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू

News Desk

लोकप्रतिनिधींना अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले ? सुप्रिया सुळेंचा सवाल

Aprna

#LokSabhaElections2019 : आता काँग्रेससोबत चर्चा पुढे जाणे शक्य नाही !

swarit