नवी दिल्ली | “राफेल बाबत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आम्ही समर्पित आहोत. रिलायन्स जॉइंट व्हेंचर तसेच पूर्ण पुरवठा साखळीद्वारे दसॉल्ट एव्हिएशन भारतात विमानांचे यशस्वी उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल”, अशी प्रतिक्रिया दसॉल्ट एव्हिएशनने दिली आहे. राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी शुक्रवारी (१४ डिसेंबर) याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. दसॉल्ट कंपनीने देखील या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dassault Aviation: Dassault Aviation welcomes the decision of the Supreme Court of India rendered today dismissing all petitions filed on the Rafale Contract signed on 23rd September 2016 in the frame of an Inter-Governmental Agreement between India and France.
— ANI (@ANI) December 14, 2018
राफेल विमान खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही, असे स्पष्ट करत केंद्र सरकार खरेदी करत असलेल्या १२६ विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राफेल करारा संदर्भात प्रत्येक लहान लहान गोष्टींची पडताळणी करणे न्यायालयाला शक्य नाही, असेही सर्वोच्च न्यायालायने स्पष्ट केले आहे.
Dassault Aviation:Dassault Aviation is dedicated to establishing successfully Make in India as promoted by PM Modi.Dassault Aviation will ensure successful production in India through Dassault Reliance Joint Venture in Nagpur as well as through a full-fledged supply chain network
— ANI (@ANI) December 14, 2018
राफेल विमान कराराला विरोध करत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसह कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारला वेठीस धरले होते. रिलायन्स कंपनीला विमान निर्मिती क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना त्यांना राफेलचे कंत्राट दिल्याने राहुल गांधीकडून भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राफेल कराराच्या खरेदीची संपूर्ण चौकशी झाली तर पंतप्रधान मोदींना तुरुंगात जावे लागेल, असेही काँग्रेसकडून सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी म्हटले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.