HW News Marathi
राजकारण

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी येत्या ५० वर्षात सत्तेत रहाण्याचे स्वप्न पहा असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला. शहा रविवारी गाझियाबाद येथील सभेत बोलत होते. राजकारणातील विजयाचा संकल्प केवळ पाच दहा वर्षांपूरता ठेऊ नका तर अगामी ५० वर्षात भाजपलाच सत्तेत ठेवण्याचा संकल्प करा. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने सत्ता टिकवली तसेच सत्तेत टिकून रहाण्यासाठी काम करा असे आवाहन अमित शहा यांनी कार्यकर्त्यांनी यावेळी केले.

अमित शहा पुढे म्हणाले, ‘सत्तेत आल्यापासून भाजपने असे कोणतेही काम केलेले नाही ज्यामुळे पक्षातील नेत्यांना अपमान सहन करावा लागेल. सध्या सर्वांनी फक्त निवडणूकीपर्यंतचा विचार न करता देशाच्या विकासासाठी जीव ओतून काम करण्याची गरज आहे. भाजप सरकारच्या कामामुळे नेहमीच सर्वजण ताठ मानेने काम करु शकतात असेही शहा यावेळी बोलताना म्हणाले.’

 

Related posts

शिवसेनेचे विचार प्रतिगामी, नवाब मलिकांची शिवसेनेवर टिका

News Desk

विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही !

News Desk

तुमची बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतो ?

News Desk