HW News Marathi
अर्थसंकल्प

PFB : मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प अधिवेशनाची तारीख जाहीर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन संसदेत ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३१ जानेनारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अंतरिम बजेट १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार, असा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीच्या समितीत घेण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली २०१९-२० या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करतील. लोकसभा निवडणूकी निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचे सादर होणारे हे शेवटचे बजेट असेल. त्यामुळे जनतेला खूश करण्यासाठी मोठ मोठ्या घोषणा करण्यात येणार आहे, अशी शक्यता काहीअर्थतज्ञांनी व्यक्ती केली आहे.

आगामी वर्ष २०१९-२० साठी अंतरिम बजेट तयार करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे. २१ सप्टेंबर २०१६ मध्ये सरकारने ९२ वर्षांची प्रथा मोडत रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र केले. त्यामुळे २०१९ मध्ये देखील रेल्वे बजेट हा सामान्य अर्थसंकल्पाचाच एक भाग असणार आहे. २०१८ मध्ये अर्थसंकल्प अधिवेशन ६ एप्रिलला संपले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Budget 2019 : नवभारताची संकल्पना आणखी विस्तारणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री 

News Desk

‘या नेत्याने’ तब्बल १० वेळा सादर केला अर्थसंकल्प , विक्रम आजही अबाधित …..

Arati More

#Budget2019 : सेन्सेक्स १५१.४४ अंकांनी वधारला

News Desk