नवी दिल्ली | राफेल डीलवरून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (४ जानेवारी) काँग्रेसकडून सतत होत असलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. संसदेत प्रत्येक ‘डबल ए’साठी ‘आरव्ही’ नव्हे तर क्यू देखील आहे. असे म्हणत सीतारामन यांनी राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे. संसदेत बोलताना सीतारामन यांनी कोणाचेही नाव न घेता, फक्त आद्याक्षरांचा वापर करत राहुल गांधींवर निशाणा साधला. सीतारामन म्हणाल्या की, विनोद करण्यासाठी आद्याक्षरांचा वापर करणे सोपे आहे. परंतु ही दुधारी तलवार आहे. त्याने तुमच्यावरदेखील वार होऊ शकतो,’ असा शब्दांमध्ये सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला.
Defence Minister in Lok Sabha: Congress did not intend buying the jets . For every 'AA' there is a 'Q' and 'RV'. #Rafale pic.twitter.com/h19l8BCnju
— ANI (@ANI) January 4, 2019
तसेच सीतारामन यांनी रॉबर्ट वाड्रांच्या नावांच्या आद्याक्षर आरव्हचा वापर करत काँग्रेसला लक्ष्य केले. रॉबर्ट वाड्रा हे सोनिया गांधींचे जावई आहेत. आरव्ह हे काँग्रेसचे जावई जावई होते, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. गुरुग्राममधील अनेक वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत.
संसदेत राहुल गांधीचे ‘डबल ए’
संसदेत (२ जानेवारी) राफेल डीलवर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारचा टीका केली. यावेळी राहुल यांनी त्यावेळी राहुल यांनी राफेल डीलमधील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना रोखले. पुढे महाजन म्हणाल्या की, अनिल अंबानी हे संसदेचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांचे नाव घेता येऊ शकत नाही. यानंतर अनिल अंबानी यांच्या नावाचे आणि आडनावाचे आद्याक्षर वापरले आणि डबल ए’ असा उल्लेख करत राफेल डीलवरुन सरकारला लक्ष्य केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.