नवी दिल्ली | अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयाप्रदा या समाजवादी पार्टीच्या नेत्या होत्या. पक्षातील नेतेत आजम खान यांच्यासोबत झालेल्या अंतर्गत वादानंतर जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या रामपूरचे सपा उमेदवार आजम खान यांच्याविरोधात उमेदवारी मिळण्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Delhi: Veteran actor and former MP Jaya Prada joins Bharatiya Janata Party. pic.twitter.com/vmZD3H1PSL
— ANI (@ANI) March 26, 2019
जयप्रदा यापूर्वी रामपूरच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी रामपूर मतदारसंघातून सपाकडून २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीत यशही मिळवले होते. जया प्रदा यांनी १९९४ मध्ये तेलगू देशम पार्टीतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. तेलुगू देशम पार्टीचे संस्थापक एन टी रामाराव यांनी त्यांना पक्षात प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु, जयाप्रदा यांचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्या तेलगू देशम पार्टीतून बाहेर पडल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.