HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसकडून चंद्रपूर मतदारसंघासाठी बांगड यांच्याऐवजी धानोरकर यांना उमेदवारी

मुंबई | काँग्रेसने आपला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे. खरंतर काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आता विनायक बांगड यांची उमेदवारी रद्द करून काँग्रेसकडून बाळू धानोरकर यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सांगण्यावरून बाळू धानोरकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला राम राम ठोकला होता. आपण त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, यांची खंत देखील अशोक चव्हाण यांना होती असे म्हटले जात आहे. दरम्यान, आता अखेर काँग्रेसकडून धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शनिवारी (२३ मार्च) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत होती. आपण आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे अशोक चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचे म्हटले जात होते. “माझे कुणीही ऐकत नाही. म्हणूनच मला माझ्या पदाचा राजीनामा द्यावासा वाटत आहे”, असे अशोक चव्हाण यांनी म्हटल्याची माहिती मिळत आहे. अशोक चव्हाण हे चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांना उमेदवारी देण्यास इच्छूक होते.

Related posts

आज संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांची बैठक अन् डीनर पार्टी

News Desk

माझा नवरा मुस्लीम आहे तर मी एक अभिमानी हिंदू !

News Desk

राफेल कराराची माहिती राहुल गांधींना कशी मिळाली ?, अमित शहांचा सवाल

News Desk