नवी दिल्ली | कर्नाटकातील हाय व्होल्टेज ड्रामावर काल (२३ जुलै) पडदा पडला आहे. कर्नाटकात जेडीएस-काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. कुमारस्वामी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात ९९ आमदारांनी सरकारच्या बाजूने, तर १०५ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे साहजिकच कुमारस्वामी सरकार कोसळले. या प्रकरणावर यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
From its first day, the Cong-JDS alliance in Karnataka was a target for vested interests, both within & outside, who saw the alliance as a threat & an obstacle in their path to power.
Their greed won today.
Democracy, honesty & the people of Karnataka lost.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 23, 2019
यानंतर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. “कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आघाडी तोडण्यासाठी बाहेरू आणि आतून दबाव तंत्र वापरत होते. आज लालसेचा विजय झाला, तर कर्नाटकामध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव झालेला पाहायला मिळाला,” असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.
Until then I suppose, the citizens of our country will have to endure their unbridled corruption, the systematic dismantling of insitutions that protect the people’s interests and the weakening of a democracy that took decades of toil and sacrifice to build.
2/2
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 23, 2019
राहुल गांधीनंतर उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रॉ यांनी देखील कर्नाटकातील भाजपच्या विजयावर संप्तत प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका यांनी त्यांच्या ट्वीट केले की, “सारे काही विकत घेता येत नाही, प्रत्येकाची बोली लावता येत नाही आणि प्रत्येक खोट्या गोष्टीचा अखेर पर्दाफाश होतो. हे भाजपने लक्षात ठेवले पाहिजे. परंतु तोपर्यंत देशातली जनतेला लोकशाही आणि भ्रष्ट्राचार यांचे हण होताना पहावे लागेल.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.