नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी (२६ एप्रिल) वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. दरम्यान, त्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी कार्यकर्ता मेळाव्याला संबोधले आहे. “मी देखील बूथ कार्यकर्ता होतो. मला देखील भिंतींवर पोस्टर्स लावायचे सौभाग्य लाभले आहे. आज या माध्यमातून मी देशभरातील सर्व नागरिक आणि कार्यकर्त्यांप्रती आभार व्यक्त करतो”, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी “मेरा बूथ, सबसे मजबूत” असा नवा नारा देखील पंतप्रधान मोदींनी दिला आहे. “लोकशाहीचा विजय व्हावा, इतकीच माझी इच्छा आहे”, असेही मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi to BJP workers at their meet in Varanasi: Banaras ka chunav aisa hona chahiye ki desh ke political panditon ko us par kitaab likhne ka mann kar jaaye https://t.co/8NJkpSIqXO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
“वाराणसीच्या निवडणुका अशा व्हायला हव्यात कि देशातील राजकीय तज्ज्ञांना त्यावर पुस्तकच लिहावेसे वाटले पाहिजे”, असे देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले आहे. “आजही काशीमध्ये ‘मोदी मोदी’च्या घोषणा दिल्या जात आहेत. लोकांना पुन्हा मोदी सरकारच हवे आहे. त्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांनी एकाही पोलिंग बूथवर भाजपचा झेंडा खाली येणार नाही याची काळजी घ्यावी”, असेही आवाहन पंतप्रधान मोदींनी कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी “महिलांनी पुरुषांच्या तुलनेत ५% अधिक मतदान करावे”, असेही आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
PM Modi to BJP workers at their meet in Varanasi: Kis party se kaun umeedwar hai, kripa karke yeh charcha mat karen, har umeedwar sammaniye hai, woh bhi loktantra ko mazboot banane ke liye maidan mein aya hai, woh humara dushman nahi hai. pic.twitter.com/GvirdM34tD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
“मोदीचा सर्वाधिक मते मिळून विजय होवो अथवा न होवो, हा माझा मुद्दाच नाही. लोक म्हणतील कि, तुम्ही पंतप्रधान आहात, पंतप्रधानपदी निवडणूक आला आहात. परंतु, त्याला काय अर्थ आहे ? मलाही त्यात काही रस नाही. लोकशाहीचा विजय व्हावा, इतकीच माझी इच्छा आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. “कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, यावर कृपया चर्चा करू नये. प्रत्येक उमेदवार सामान्य आहे. तो आपला शत्रू नाही. तो देखील लोकशाहीला मजबूत करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi in #Varanasi: Modi sabse zyada vote se jeet ya na jeet, ye record ka mudda hai hi nahi. Duniya puchagi nahi, arey tum toh Pradhan Mantri ho tum jeetke aaye ho usmein kya hai, woh bematlab hai aur mujhe bhi interest nahi hai. Mujhe interest hai loktantra jeetna chahiye. pic.twitter.com/9DcQFD29Cr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.