HW Marathi
राजकारण

नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला | मनमोहन सिंग

नवी दिल्ली | नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग हे मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला आज दोन वर्षे पूर्ण झाली.  आर्थिक धोरणांवर भाष्य करणारे प्रसिध्दी पत्रक काढून मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच मनमोहन सिंग यांनी असे देखील म्हटले की, मोदी सरकारने आगामी काळाता असे कोणतेही पाऊल उचलू नये, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण होईल. मोदी सरकारने २०१६ मध्ये अनेक त्रुटींसहीत तसेच गांभीर्याने विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे उद्ध्वस्त झालेली भारतीय अर्थव्यवस्थेसहीत समाजातही याचे परिणाम स्पष्टपणे दिसत आहेत.

नोटाबंदीच्या निर्णयाला संकुचित विचारांनी घेतलेला असल्याचे म्हटले आहे. या निर्णयानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वात जास्त त्रास सर्वसामान्य जनतेला होत होईल. त्यामुळे धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो असे म्हणतात. एखादी जखम झाल्यास ती भरून निघते, परंतु नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे समोर आले आहे.

 

Related posts

…तर मराठा आंदोलन भडकले नसते

News Desk

शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकला

News Desk

भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत काय? | राज ठाकरे

News Desk