मुंबई | “मेट्रोच्या कारशेडचा जो विवाद या ठिकाणी झाला. हा वाद पर्यावरणापेक्षाही राजकीय जास्त झाला, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे. मेट्रो 3 च्या चाचणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज (30 ऑगस्ट) हिरवा कंदील दाखवला आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेडवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नाव न घेता टीका केली. मेट्रो लाईन 3 ही कुलाबा – वांद्रे – सिप्झ अशी असणार असून या मेट्रो 3 ची आज (30 ऑगस्ट) झालेली चाचणी ही सारीपूतनगर ते मरोळ नाकापर्यंत चाचणीला सुरुवात झाली आहे.
दरम्यान फडणवीस म्हणाले, “मध्यतरीच्या काळामध्ये काही वादविवाद झाले. ज्या काही स्थगिती आल्यामुळे प्रकल्प डिसेंबरमध्ये अर्धा धावणार आहे. लगेच पूर्ण देखील धावणार आहे. हे सांगत असताना मी हे देखील सांगतले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय केला नसता. तर पुढच्या वर्षी अर्ध सोडाच अजून चार वर्ष मेट्रो ट्रेन धावू शकली नसती. ऐवढीजी 200 हजार कोटी गुंतवणूक केलेली आहे. ती गुंतवणूक एक प्रकारणे डेड झालेली असती. त्यावर अजून 15 ते 20 कोटी रुपये खर्च करावे लागले असते. या सगळ्या तिकीटाचा भार सर्व सामान्य मुंबईकरावर पडला असता. आणि त्यांच्या तिकीटातून तो वसूल झाला असता. खरे तर या निमित्ताने निश्चितपणे सांगितले पाहिजे. मेट्रोच्या कार कारशेडचा जोकाही विवाद या ठिकाणी झाला. हा वाद पर्यावरणापेक्षाही राजकीय जास्त झाला, असे माझे मत आहे. याचे कारण असे आहे की, यासंदर्भात उच्च न्यायालयाने चांगला निर्णय देऊन याला मान्यता दिली. आमचे जे सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी मेट्रो कारशेड तयार करण्याकरिता मान्यात दिली. आणि तो निर्णय कोणी वाचला, तर तो अतिशय स्पष्ट आहे. सर्व प्रकारच्या पर्यावरणाच्या विषयाचा परामश करून या ठिकाणी ही परवानगी देण्यात आली.”
मेट्रो मुंबईकरांची नवी लाईफलाईन बनणार
“मुंबईची नव्याने लाईफलाईन बनणार आहे. अशा प्रकारची मेट्रो लाईन 3 त्यांच्या पहिल्या ट्रेनची चाचणी आपण या ठिकाणी केली आहे. आणि यशस्वीरित्या ती चाचणी झालेली आहे. मला असे वाटते की, आता ही मेट्रो धावण्यापासून कोणीही थांबवून शकत नाही. हा सिगनल जणून आपण दिला आहे. मुख्यमंत्री पदानी शपथ घेतल्यानंतर पहिले काम काही केले असेल. तर मुख्यमंत्र्यांनी मेट्रो 3 च्या कामातील सर्व अडथळे त्यांनी दूर केले. यामुळे आता मेट्रो 3 मध्ये काही अडचणी राहिलेल्या नाहीत. जर काही आल्या तर त्याही अडचणी दूर करण्याचा मानस आमचा आहे,” असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.