HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

हा बाबा सकाळी लवकरच शपथ घेत असतो !

नाशिक | “काही जण विचारत होते कि, मी सकाळी इतक्या लवकर येईन का ?”, त्यावर एक जण म्हणाला, “येईल येईल. हा बाबा सकाळी लवकरच शपथ घेत असतो”, असे गंमतीदार विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथील एका उदघाटन कार्यक्रमात केले आहे. अजित पवार यांनी नाशिक दौऱ्यावर असताना आज (३१ जानेवारी) सकाळी सकाळी लवकर दिंडोरीतील कादवा इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे, इथल्या आयोजकांचा देखील काहीसा गोंधळ उडाला. यावेळी बोलताना, अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांसोबत भल्या पहाटे घेतलेल्या शपथीच्या आठवणी जाग्या केल्या आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.

“माझ्यामुळे तुम्हाला लवकर इतक्या उठवून यावं लागलं. म्हणून, माफ करा. पण, आज १० वाजल्यापासून माझ्या बऱ्याच भेटीगाठी आणि बैठका आहेत. त्यामुळे, त्यानंतर दिवसभरात मला वेळ काढता येणार नाही. म्हणून, मी भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकर करून घेऊ असे म्हटले. पण मला आमदार सांगत होते इथे अशी चर्चा होती कि, मी सकाळी इतक्या लवकर येईन का ? त्यावर एकजण म्हणाला कि, बाबा हा सकाळी लवकरच शपथ घेत असतो”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आणि उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला. नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यासंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षांमध्ये बोलणी आणि बैठका सुरु असताना अचानक एका दिवशी पहाटे अजित पवार यांनी भाजपला साथ देत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

Related posts

देशातील ‘हे’ पहिले राज्य झाले ‘कोरोनामुक्त’, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

News Desk

#Vidhansabha2019 : राज्यात १५०४ उमेदवारांनी घेतले अर्ज मागे

News Desk

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk